वाढता उन्हाळा धरणातील घटलेली पाणीपातळी याच्याबरोबर उन्हाळ्यामध्ये वाढणारा विजेचा वापर यामुळे राज्यात विजेची टंचाई जाणवत आहे.

परिणामी लोडशेडिंगच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. आधीच शेतीसाठी दिली जाणारी वीज ही अपुरी किंवा अवेळी मिळते यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
विजेची टंचाई निर्माण झाल्यामुळे व पुढील काही महिने यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात महावितरणला विज खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळनिर्णय राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरण ला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील वीज निर्मिती आणि उपलब्धतेची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत किंवा १५ जूनपर्यंत वीज खरेदी करता येणार आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक