Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन

रांगोळी स्पर्धा सहभागी व्हा..
मित्राला शेअर करा

रांगोळी स्पर्धा सहभागी व्हा..

भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीराव फुले जयंती निमित्ताने ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने १० एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महामानवाना अभिप्रेत अशी जयंती साजरी करून शैक्षणिक कार्यात मुलींना प्रोत्साहन देवुन जयंती साजरी करण्याच्या हेतूने या रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धा रविवार दि. १०/४/२०२२ सांय ४ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहेत.
स्पर्धेचे ठिकाण – भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संचलित श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी वाणी प्लाॅट देवीच्या मंदीरासमोर बार्शी.

अशी माहिती ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी दिली.