पंढरपूर तालुक्यातील भाळवणी या गावातील युवक मोहसीन सलीम तांबोळी यांची युवा वैज्ञानिक म्हणून निवड केल्याची माहिती सचिव डॉ.भरत काळे यांनी दिली आहे.
राज्याच्या वैज्ञानिक क्षेत्रातील आघाडीची संस्था महाराष्ट्र विज्ञान अकादमीने या वर्षाच्या फोलोची आणि युवा वैज्ञानिकांची निवड केली आहे. आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन कार्य केलेल्या मराठी वैज्ञानिकाची या अकादमीवर निवड केली जाते.
राज्याला भेडसावणारे वैज्ञानिक आणि तांत्रिक समस्येच्या निराकरणासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी 1976 मध्ये अकादमीची स्थापना केली होती. दरवर्षी अकादमी फेलो व यंग असोसिएटची निवड करतात.
अकादमीत फेलो म्हणून 1 हजारहून अधिक शास्त्रज्ञ आहेत आणि अधिक असोसिएटस कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या 31 आणि 23 युवा सहकारी शास्त्रज्ञाची निवड केली आहे.अकादमीचे अध्यक्ष प्रा.जी. डी.यादव यांनी सर्वांना शपथ दिली.
या निवडी बद्दल मोहसीन तांबोळी यांचे ग्रामस्थांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!