उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणीपूर मध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशाचा आनंद बार्शीतील भाजपच्या समर्थकांसह आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी व्यक्त केला. नगरसेवक विजय राऊत आणि विलास रेणके यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी नगर सेवक पाचू उघडे, रोहीत लाकाळ उपस्थित होते.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी पक्षनेते विजय नाना राऊत, माजी नगरसेवक विलास आप्पा रेनके, सुभाष शेठ लोढा यांच्या नेतृत्वाखाली, भाजपाचा राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद, भाजपाच्या वतीने फटाके फोडून व हलगी नाद करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील जामगाव रोडवरील भोसले चौक, नगर परिषद चौक सह विविध ठिकाणी हलगीच्या निनादात आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी नगरसेवक दीपक राऊत, नागजी दुधाळ, विजय चव्हाण, सुभाष लोढा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर