बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित बार्शी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा सिजन तीन 2022 या वर्षीचा चषक राजाभाऊ देशमुख यांच्या एस आर इगल्स या संघाने अंतिम सामना जिंकला.
या सामन्याचे नाणेफेक बार्शीचे उद्योगपती शिवाजी (नाना ) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आज शिवशक्ती मैदान बार्शी येथे झालेल्या राजाभाऊ देशमुख यांच्या एस आर इगल्स आणि विशाल बागल यांच्या अदिती स्कायवॉकर्स दरम्यान 20/20 षटकांचा सामना झाला प्रथम नाणेफेक जिंकून अदिती स्कायवॉकर्स या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अदिती स्कायवॉकर्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटका मध्ये 7 गड्याच्या मोबदल्यात 117 धावा केल्या.
![](https://i0.wp.com/kranti-news.in/wp-content/uploads/2022/05/Live-cricket-score-kranti.jpg?resize=640%2C480&ssl=1)
त्यामध्ये रोहन शिंदे 35 याने सर्वाधिक धावा केल्या कृष्णा पडगे याने 16 धावांचे योगदान दिले एस आर इगल्स च्या संघा कडून गोलंदाजी करताना प्रणव जाधवर याने 35 धावा देऊन मध्ये 3 महत्वपूर्ण विकेट घेतल्या तसेच यज्ञनेश झालटे, पार्थ लोंढे, आणि आदित्य पवार यांनी प्रत्येकी एक एक विकेट मिळवल्या यानंतर एस आर इगल्सने फलंदाजी करताना 18-4 षटका मध्ये 6 गड्याच्या मोबदल्यात 118 रन काढून 4 विकेटसनी हा अंतिम सामना जिंकला एस आर इगल्स कडून फलंदाजी करताना कर्णधार रविराज डोळे याने नाबाद 67 धावा केल्या आदित्य पवार याने 21 धावायचे महत्वपूर्ण योगदान दिले अदिती स्कायवॉकर्स कडून गोलंदाजी करताना महेंद्र गादेकर याने 2 विकेट घेतल्या, अक्षय देशपांडे, अथर्व चिंतामणी, तेजस जाधव यानी प्रत्येकी 1/1 विकेट घेतली आशाप्रकारे बी पी एल 2022 चषक सीजन 3 चा मानकरी दुसऱ्या वेळेस एस आर इगल्सचा संघ ठरला.
![](https://i0.wp.com/kranti-news.in/wp-content/uploads/2022/05/Cricket-tournament-kranti-.jpg?resize=368%2C207&ssl=1)
या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार एस आर इगल्स चा कर्णधार रविराज डोळे यास मिळाला एस आर इगल्स या संघाचे प्रशिक्षक ज्ञानेश आहिरे तर अदिती स्कायवॉकर या संघाचे प्रशिक्षक म्हणून विवेक दुग्गम यानी काम पाहिले.
सामन्याचे पंच म्हणून श्रेयश घाडगे आणि अमर शेंडगे यांनी काम पाहिले विजयी संघाचे बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यानी अभिनंदन केले
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड