Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते बार्शीत वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वृक्षलागवडीचा शुभारंभ

अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते बार्शीत वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वृक्षलागवडीचा शुभारंभ

व्हिडीओ - भिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते बार्शीत वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वृक्षलागवडीचा शुभारंभ
मित्राला शेअर करा

वृक्ष संवर्धन समिती बार्शी कडुन या वर्षीच्या वृक्षारोपन कार्यक्रमाचा शुभारंभ सिने अभिनेते तसेच सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

व्हिडीओ

या वेळी उद्योजक प्रशांत पैकेकर, वन अधिकारी मनोज बारबोले, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्योजक संतोष ठोंबरे, अविनाश सोलवट नगरपालिका अरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, गणेश पाटिल, पत्रकार सचिन वायकुळे, पत्रकार शहाजी फुरडे पाटिल, गणेश गोडसे , धिरज शेळके, अजय पाटिल, सायरा मुल्ला, सौ. शोभा घुटे आदी उपस्थित होते. वृक्ष संवर्धन समितीने मागच्या तीन वर्षा पासुन शहर व परिसरात दहा हजार झाडे लावली असुन ती गल्या प्रकारे जोपासली आहेत. या वर्षी वृक्ष संवर्धन समितीने पाच हजार देशी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

या वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आल्याचे वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना सयाजी शिदे यांनी देशी तसेच दुर्मिळ होत असलेली झाडे लावावीत व ती जोपासावी. लावलेल्या झाडांची लहान बाळासारखी काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच प्रस्ताविक संतोष गायकवाड यांनी केले.सुत्र संचालन अतुल पाडे व आभार उमेश नलावडे यांनी मानले. या कार्यक्रमात सरनवाडी येथील सैराट फेम हालगी वादक कलाकार यांनी आपल्या हलगी वादनाने वेगळीच रंगत आणली.

या वेळी वृक्ष संवर्धन समितीचे सचिन शिदे, राणा देशमुख, डॉ. सचिन चव्हाण, राहुल तावरे, अजित नडगीरे , महेश बकशेट्टी, सुधिर वाघमारे, डॉ. प्रशांत मांजरे, डॉ. प्रविन मांजरे, बाबासाहेब बारकुल, शशी पोतदार, आण्णा ठोंगे, डॉ. विजय पवार, डॉ. विनायक हागरे, डॉ. वसुदेव सावंत, सचिन थोरबोले, चारु जगताप, हर्षद लोहार, उदय पोतदार, तेजस विधाते, डॉ श्रीराम देशमुख, अक्षय भुईटे, डॉ. केशव मुळे, रोहित दिक्षित, सुमित खुरंगुळे, सुनिता गायकवाड, रेखा विधाते चंद्रकला बोरगावकर, सुलक्षणा नलवडे, सुनिल फल्ले राहुल काळे, निलेश घटे, प्रफुल्ल गोडगे, गणेश रावळ मिताली पाटिल , बुगडे, घोळवे, कुमार चांदने आदी पुरुष तसेच महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्तीथ होते.

वृक्ष संवर्धन समितीचे कार्य चालूच आहे अणि निरंतर चालत राहणार आहे. नागरिकांना नम्र विनंती की किमान आपल्या दारात लावण्यात आलेल्या झाडांना तरी थोडेसे पाणी घालावे याकरिता आपल्या लहान मुलांमध्ये जागृती निर्माण करावी.