उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याला प्राचीन वैभवशाली असा इतिहास लाभला आहे. तेर हे सातवाहन काळातील मोठे व्यापारी नगर होते म्हणून तेर ला येणाऱ्या विविध प्राचीन मार्गावर ठिकठिकाणी सातवाहन कालीन वसाहती स्थापन करण्यात आल्या त्याचे अवशेष विविध भागात सापडले असून यात नव्या वसाहतीची भर पडली आहे.
हि वसाहत उस्मानाबाद जवळ उस्मानाबाद बार्शी मार्गावर एक प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र व पर्यटन केंद्र असलेल्या श्री हातलाई देवी डोंगर यावर सापडली आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी ब्राम्ही लेख असलेले सातवाहन कालीन नाणे खोचरे यांना सापडले असून हा खूप महत्वाचा पुरावा हा काळ निश्चितीसाठीचा पुरावा समजला जातो. हे सापडलेले नाणे हे जस्त धातूचे असून अति प्राचीन म्हणजे जवळ पास दोन हजार वर्षे जुने आहे. यावर एका बाजूवर हत्ती ब्राम्ही लिपीतील दि, मा, वी, स असे शब्द असून नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर उजजैन चिन्ह आहे. नाणे, लेख हे अव्वल दर्जाचा पुरावा मनाला जातो. त्यामुळे येथील वसाहतीचा काळ ठरवण्यास मदत होईल. सदर बातमी abp माझा वृत्तवाहिनीने देखील प्रसारित केली आहे.
येथे प्राचीन विटा व खापराचे तुकडे, खापरी बुड मोठ्या प्रमाणावर इतिहास व पुरतत्व अभ्यासक श्री. जयराज खोचरे यांना सापडले असून त्यांना या भागात अजून काही ठिकाणी अशा वसाहती सापडल्या आहेत.
त्यामुळे इतिहास व प्राचीन मार्ग यावर नव्याने प्रकाश पडणार आहे तसेच जवळच लेणी असून याचाही संबंध जोडून पाहणे महत्वाचे ठरू शकते.
निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे धार्मिक व पर्यटन स्थळ आणि जवळ हि सापडलेली प्राचीन वसाहत अभ्यासक, पर्यटकांना नक्कीच पाहायला व अभ्यासाला उपयोगी पडेल व प्राचीन काळातील वैभवशाली इतिहास हि लोकांना कळून येईल.
उस्मानाबाद परिसरात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्याठिकाणी पुरातत्व अवशेष आजही आढळून येतात यासाठी पुरातत्व खात्याने विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे. याच डोंगरावर जर साईट म्युझियम उभारले तर येथे सापडलेल्या वस्तु इथे ठेवता येथील जेणे करून त्याचे जतन व संवर्धन करता येईल अशी माहिती जयराज खोचरे यांनी दिली.
जयराज खोचरे
इतिहास व पुरातत्व अभ्यासक
7020928941
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत