दि २४ मे. बार्शी तालुक्यातील आगळगाव गावचे रहीवाशी सध्या बार्शी शहरात भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी या शाळेतील शिक्षक असलेले श्री गणेश नारायण कदम यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
या वाढदिवसादिवशी बार्शी शहरात सध्या झाडे लावा झाडे जगवा हे सांगत नाही तर दररोज न चुकता सकाळी ६ ते ८ या वेळेत वृक्ष संवर्धन करते. अशा वृक्ष संवर्धन समिती बार्शी या समितिला निधी देवुन छोटीशी मदत केली. याच बरोबर या दिवशी सामाजिक कार्य करणारे सुमितभैय्या खूरंगळे संतोष शेळगावकर व राहूल भैय्या वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मुलांना शिक्षणाची आवड आहे पण सूविधा नसतात साहीत्य नसते अशा दोन मुलांना दप्तर, वह्या कंपास ,चिञकला वही. पेन, असे प्रत्येकी दोघांना देण्यात आले.
आपण समाजात राहतो आपण समाजाच देण आहे या वृत्तीने ही शालेय साहीत्यामुळे शिक्षणापासुन वंचीत राहु नये ही भावना होती. श्री गणेश कदम सर हे समाजशिल आहे.ते विवीध समाज कार्यात अग्रेसर असतात.या अगोदर त्यांनी रक्तदान शिबिर, विवीध मुलांना शालेय साहीत्य वाटप केले आहे. ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे मार्गदर्शक म्हनुन काम करतात. या माध्यमातुन त्यांनी खुप समाजउपयोगी उपक्रमाना दिशा दिली. असे ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी चे संस्थापक राहुल वाणी यांनी माहीती दिली. या वाढदिवसानिमीत्त वृक्ष संवर्धन यासाठी काम करू असे सांगीतले श्री गणेश कदम सर यांनी सांगीतले
हे उपक्रम राबण्यासाठी मला सुमितभैय्या खुरंगळे, राहुल वाणी, नागनाथ सोनवणे, उमेश काळे सर, ओन्ली समाज सेवा समिती, आणी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री संतोष गुळमिरे सरांचे मार्गदर्शन मिळते असे शेवटी श्री गणेश कदम सर यांनी सांगीतले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर