शिवसेना उपनेते तथा, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष, शेतकरी शेतमजूर सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष, शिवव्याख्याते प्रा. नितीनजी बानुगडे पाटील सर बार्शी येथे कार्यक्रमाला आले असता शिवसेना, युवासेना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, बार्शी शहर तालुका च्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
शिवसेना उपनेते शिवव्याख्याते प्रा. नितीनजी बानुगडे पाटील सर मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी आयोजित ग्रामदैवत श्री भगवंत जन्मोत्सव निमित्त आयोजित भगवंत व्याख्यानमाला या कार्यक्रमास बार्शी येथे आले असता शिवसेना, युवासेना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , बार्शी शहर तालुका च्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच त्यांची शेतकरी शेतमजूर सेनेचे अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेना बार्शी शहर प्रमुख हेमंत रामगुडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख विजय माने, युवा सेना बार्शी तालुका प्रमुख पांडुरंग घोलप, विजय घोंगडे, उपळाई ठो विभाग प्रमुख नितिन मोहोळे आदि शिवसैनिक उपस्थित होते.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत