Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > बार्शी टेक्स्टाईल मिल्स चालू करा, देवेंद्र फडणवीसांना निवेदन

बार्शी टेक्स्टाईल मिल्स चालू करा, देवेंद्र फडणवीसांना निवेदन

बार्शी टेक्स्टाईल मिल्स चालू करा, देवेंद्र फडणवीसांना निवेदन
मित्राला शेअर करा

बार्शी – भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य ) देवेंद्र फडणवीस यांना बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत कामगार संघटनांनी मिल सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले.

बार्शी टेक्स्टाईल मिल्स बार्शी ही भारत सरकारच्या अधिपत्याखाली चालत असलेला उद्योग घटक असून मिल 23 मार्च 2020 कोविड महामारीपासून बंद करण्यात आली. त्यानंतर देशातील सर्व उद्योग चालू करण्यात आले परंतू आज मित्तीस बार्शी टेक्स्टाईल मिल्स चालू करण्यात आली नाही. याबाबतीत आ. राऊत यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांना लक्ष घालून मिल चालू करण्यासंदर्भात बोलावे, अशी विनंती केली. शनिवारी टेंभुर्णी येथे ही भेट झाली. त्यानंतर मी या बाबतीत मी प्रयत्न करेन असे अश्वासन आमदार राजेंद्र राऊत व राष्ट्रीय गिरणी कामगार संघ बार्शी. जनरल सेक्रटरी नागनाथ सोनवणे व रामेश्वर सपाटे यांना फडणवीस यांनी दिले.

निवेदनात बार्शी टेक्स्टाईल मिल्समध्ये 80 % महीला कामगार आहेत. तसेच सध्या कामगार वर्गास 50% पगार देतात तो ही वेळेस मिळत नाही. तेव्हा आम्हास 100 % पगार कामगारांना मिळवा ही मागणी दिली आहे हे निवेदना बरोबरच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय श्री. पीयूष गोयल याचे निवेदन देण्यात आले आहेत. निवेदन आमदार राजेंद्र राऊत, विलास रेणके, व जनरल सेक्रटरी नागनाथ सोनवणे.खजिदार रामेश्वर सपाटे तसेच पिंटू खराडे हे उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार राऊत यांनी प्रविण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हजर होते. बार्शी टेक्स्टाईल मिल्स बार्शी पुन्हा चालू करण्यात याव्यात म्हणून आमदार राऊत यांनी महत्वपूर्ण भेट घडवून दिली. याबाबत आम्ही राष्ट्रीय गिरणी कामगार संघ बार्शी यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले. तसेच, कामगार वर्गावर आपले लक्ष असावे, अशी कळकळीची विनंतीही कामगारांनी केली.