छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणखीन १ अप्रकाशित शिवकालीन चित्र युरोपमध्ये असून ते प्रथमच प्रकाशात येत आहे. चित्र सतराव्या शतकातील गोवळकोंडा चित्रशैलीमध्ये चित्रित केलेले हे चित्र जलरंगात (Water color) या माध्यमातील आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी दिली
ते म्हणाले की
या निमित्ताने महाराजांची ४ चित्रे सन २०२१ मध्ये प्रकाशित करता आली.
शिवछत्रपतींसंबंधी अशा अनेक प्रकारच्या नवीन संशोधनावर आधारीत आणि तसेच महाराजांच्या सर्वच उपलब्ध अस्सल चित्रांबद्दल माहिती देणाऱ्या आपल्या पुस्तकाचे प्रकाशन लगेचच या महिना अखेरीस होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना हे माझे संशोधन अर्पण करतो.
तारे यांनी शोधलेल्या या चित्राचे अनावरण शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आले असून चित्राच्या प्रकाशनासाठी संग्रहालयाकडून परवानगी घेण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्राचे संशोधन प्रकाशित करण्यातआले. फ्रान्स मधील सेव्ही कलेक्शन या ऐतिहासिक वस्तुसंग्रहात महाराजांचे हे चित्र सध्या आहे.
गोवळकोंडा चित्र शैलीचे हे चित्र १७ व्या शतकातील असल्याच सांगण्यात आले आहे त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या महाराजांचे हे चित्र विशेष महत्वाचे मानले जात आहे
यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे आणि इतिहास अभ्यासक राजेंद्र टिपरे हे यावेळी उपस्थित होते. या पूर्वी तारे यांनी जूनमध्ये शिवाजी महाराजांची तीन चित्रे संशोधित व प्रकाशित केली होती. त्यानंतरचे हे चित्र चौथे असून याबाबत तारे म्हणाले, ”महाराजांच्या चित्राबरोबरच भारतामधील सतराव्या शतकातील अन्य व्यक्तींची चित्रे सुद्धा या संग्रहालयात आहेत. अठराव्या शतकापासून ही सर्व चित्रे फ्रान्समधील लुईस चार्ल्स या सरदार घराण्याच्या ऐतिहासिक वास्तू संग्रहात होती. तेथून हे चित्र फ्रान्समधील सॅव्ही नावाच्या संग्राहकाच्या ऐतिहासिक वास्तू संग्रहालयामध्ये हस्तांतरित झाली. सध्या सर्व चित्रे अल्बम स्वरूपात सॅव्ही कलेक्शनमध्येच आहेत.”
”छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याकडे असलेली माहिती अपूर्ण आहे. मुघल आक्रमणात महाराजांच्या कार्यालयीन दफ्तरखान्यातील कागदपत्रे नष्ट झाली. अन्यथा महाराजांविषयी अधिक तपशीलवार माहिती उपलब्ध झाली असती. मात्र महाराजांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आजघडीला इतिहास अभ्यासकांची आपल्याला गरज आहे.” असे बलकवडे म्हणाले.
इतिहास संशोधक मंडळाचे संशोधनाचे कार्य पुढील पिढ्यांना इतिहास संदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यास महत्वाचे आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद