अल्प गुंतवणुकीत अणि अल्प वेळेत जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे तरुणांचा ओढा असतो यासाठी विविध मार्ग शोधताना दिसतात.
ग्रामीण भागात शिक्षित उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर इंटरनेट सोबत 4 G सेवा ग्रामीण भागात उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान अगदी खेड्यापाड्यात जलद गतीने पोहोचत आहे.
जोखीम स्वीकारल्याशिवाय फायदा नाही हे जरी खरं असलं तरी क्रिकेट टीम निवडून पैसा कमवायचा विचार करणारा वेगळाच वर्ग आहे यामध्ये अगदी शाळकरी मुले सुद्धा दिसून येतात.
याच तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक फायदा कसा होईल याचा विचार तरुण करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत याचाच एक भाग म्हणजे छोट्या शहरात त्याच बरोबर ग्रामीण भागात शेअर बाजारामधील वैयक्तिक गुंतवणुकीकडे तरुणाईचा कल वाढला.माफक किमतीत high-speed 5 G जी मोबाइल फोन खरेदीचाही मोठ्या प्रमाणात वाढली.त्याच सोबत ऑनलाईन शिक्षणामुळे ही मोबाईल सोबत इंटरनेट वापरकर्ते मोठ्या प्रमाणात वाढले अणि भविष्यात वाढणार आहेत.
तरुणाईच्या शेअरबाजाराच्या आकर्षणामुळे नवीन गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. अगदी चौकात टपरीवर, कट्ट्यावर निफ्टी, सेन्सेक्स, लाॅट आय.पी.ओ. कमोडिटी असे शब्द सर्रास ऐकायला येतात.
विविध ब्रोकर्स कंपन्यांनी मोबाइल ॲपद्वारे विनाशुल्क डिमॅट खाते उघडून देतआहेत त्याचसोबतअनेक राष्ट्रीयकृत बँकेमार्फत सुद्धा ही सेवा उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे अगदी कमीत कमी पन्नास शंभर रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक या ॲपद्वारे सहजरीत्या करता येते.
परंतु मार्केटचा योग्य अभ्यास करूनच गुंतवणूक करणे फायद्याचे आहे अन्यथा बाजारातील चढ उतारा मुळे गुंतवणूकदारांना फटका बसू शकतो असे जाणकार नेहमी सांगत असतात. तरीसुद्धा गुंतवणुकीचा हा वेग काही केल्या कमी होत नाही. या गुंतवणुकीसाठी लागणारे मोबाइल ॲपचे डाउनलोड रेटिंग प्रचंड वाढले आहे त्याच बरोबर शेअर मार्केट संदर्भातली काही ॲप शेअर करून 200 रुपये ते 1000 रुपये पर्यंत रोख रक्कम थेट हे ॲप शेअर करण्याऱ्याच्या खात्यात जमा करतात. हे एक वेगळे आकर्षण आहे क्षेत्रांतील उलाढाल वाढली. सर्रास मोबाइलमध्ये व्हाॅटस्ॲप, फेसबुक च्या जोडीला विविध ब्रोकरेज कंपन्यांची ॲप दिसू लागली आहेत.
सध्याच्या तेजीचा फायदा घेत फक्त ब्रँड व्हॅल्यूच्या जोरावर अनेक कंपन्या आयपीओ आणत आहेत.सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी आमिषाला बळी न पडता संपूर्ण अभ्यास असल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये. नवीन गुंतवणूकदारांनी फक्त प्रस्थापित कंपन्यांमध्ये अथवा म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीची गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ञ देत असतात.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान