Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये सुरु होणार महापालिकेचे मोफत कोचिंग सेंटर

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये सुरु होणार महापालिकेचे मोफत कोचिंग सेंटर

मित्राला शेअर करा

पुणे महानगरपालिकेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

या कोचिंग सेंटरद्वारे केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच या सेंटरमध्ये यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या एकूण 150 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे – तसेच या प्रस्तवाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देखील मिळाली आहे – असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले

किती विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण ?

● एकूण 150 विद्यार्थ्यांची बॅच असेल

● यामध्ये राखीव गटातून 100 विद्यार्थी तर

● खुल्या गटातून 50 विद्यार्थी असणार तसेच

● विद्यार्थ्यांना परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाणार आहे

या सुविधाही मिळणार

▪️ पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन

▪️ मुलाखतीचे कौशल्य व ग्रुप डिसीजनचे आयोजन तसेच

▪️ सराव परीक्षा व मुलाखतीची सर्व तयारी घेतली जाणार

पुणे महानगरपालिकेच्या सामाजिक विभागाकडून या कोचिंग सेंटरचे काम पाहिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. समाजातील विशेषतः आर्थिकदृटया दुर्बला घटकातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण न घेता गरजू विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकणार आहेत. तसेच प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण व संबंधित विद्यार्थ्यांची आर्थिक स्थितीही विचारात घेतली जाणार आहे अशी माहिती माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुण्यामध्ये मोफत कोचिंग सेंटर सुरु होणार- हि माहिती स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे थोडासा वेळ काढून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अवश्य शेअर करा.