सर्व सातारा मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या Barshi Runner’s चे खूप खूप अभिनंदन.
श्री अमृत रोहिदास खेडकर टेंभुर्णी पोलीस यांनी सातारा Hill मॅरेथॉन २१ कि.मी. फक्त २ तास ६ मिन. मध्ये पूर्ण करून रौप्य पदक (Silver Medal) मिळविले त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
Without injury सर्वांनी मॅरेथॉन पूर्ण केली.
सदर मॅरेथॉनमध्ये डाॅ. कुमार सर यांनी खूप चांगल्या रित्या सर्वांची सोय केली. गेल्यापासून सर्वांसाठी राहण्याची जेवणाची खूप चांगली सोय केली.

साताऱ्यातील प्रसिद्ध यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक श्री दशरथ सगरे सर यांची डाॅ. कुमार सर यांच्यामुळे ओळख झाली.श्री सगरे सर यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये सर्वांची राहण्याची जेवणाची खूप चांगली सोय केली.
तसेच सर्व रनर्स यांचा सत्कार ही केला. आभाळा एवढ्या माणसाकडून आपल्या रनरचा सत्कार होणे एवढे मोठे भाग्य आज लाभले खूपच चांगले व्यक्तिमत्त्वाचे आज दर्शन झाले
सर्व बार्शी रनर्स कडून कर्मवीर जगदाळे मामा यांचा वारसा पुढे चालू ठेवणारे यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक श्री दशरथ सगरे सर यांनी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते अशी प्रतिक्रिया अमृत खेडकर यांनी दिली व संयोजकांचे श्री अमृत रोहिदास खेडकर यांनी आभार मानले.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार