प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवण्यासाठी राजकीय पक्षांनी बुथ लेवल एजंटची नेमणूक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले आहे.
![](https://i0.wp.com/kranti-news.in/wp-content/uploads/2024/09/1000886736.jpg?resize=640%2C479&ssl=1)
मतदार यादी पुनरिक्षण कार्यकमांतर्गत ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान जिल्ह्यातील 1 लाख 56 हजार 950 मृत, दुबार तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात आली होती. या वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी ज्या मतदारांची चुकीने वगळणी झाली आहे. अशा मतदारांचे नाव, नमुना 6 अर्ज भरून पुनश्च: मतदार यादीत समाविष्ट करणेची कार्यवाही मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत सुरू आहे.
याबाबत बीएलओ सोबत समन्वय ठेवण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांचे बुथ लेवल एजंट (BLO) नेमण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवाहन केले आहे.
याबाबत राजकीय पक्षांची बैठका घेऊन अशी मोहीम सुरू असून ज्या मतदारांची चुकीने नावे वगळणी झाली असेल त्यांचे नमुना 6 चे अर्ज बीएलओ यांचेकडून भरून देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी बीएलओ यांची नेमणूक करून त्याची यादी जिल्हा निवडणूक कार्यालयास लवकरात लवकर सादर करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन