या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते प्रा. तानाजी ठोंबरे सर, शोकत शेख, लहू आगलावे, प्रविण मस्तूद ए. बी कुलकर्णी, सरिता कुलकर्णी व बार्शी टेक्स्टाईल मिल्स बार्शी जनरल सेक्रेटरी नागनाथ सोनवणे व अभिजीत चव्हाण, अमोल तिकटे, रामेश्वर सपाटे, गोपी धावारे, नागनाथ गोसावी, प्रसाद पवार, देविदास ननवरे, नागनाथ उपळकर व सुवर्णा बोकेफोडे यांनी भाग घेऊन बार्शी टेक्स्टाईल मिल्स चालू करा. कामगारांची हक्काचे बोनस व ग्रॅज्युटी तसेच कामगारांना 100 %पगार मिळावेत आशा मागण्यांबाबत निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

या आंदोलनास मुंबई संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर, गोविंदरावजी मोहीते, निवृत्ती देसाई, सुनिल बोरकर, अचलपूर संघटनेचे अध्यक्ष राजेश जी खोलापूरे, चंद्रकांत कनकुरे यांनी जाहीर पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा बाबत जनरल सेक्रेटरी नागनाथ सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले. मागण्यांबाबत निवेदनात लक्ष्मी मोहीते, रेखा वराडे व सहकाऱ्यांनी सह्यांचे निवेदनदिले. यावेळी कामगार एक जुटीचा विजय असो अश्या घोषणा देण्यात आल्या.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक