दैनिक लोकमतच्या वतीने देण्यात आलेला पहिला डिजीटल माध्यमासाठीचा पुरस्कार ‘थोडक्यात’ न्यूज पोर्टलला मिळाला आहे.
थोडक्यातचे संस्थापक कृष्णा वर्पे (Krishna Varpe) यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृष्णा वर्पे यांनी सुरू केलेलं ‘थोडक्यात’ हे कमीत कमी शब्दात बातम्या देणारं मराठीतील पहिलं न्युज पोर्टल ठरले आहे.
कमीत कमी शब्दात बातम्या देणारं व सर्व सोशल मीडिया माध्यमांवर २८ लाखांहूनही अधिक फॉलोवर्स असलेलं थोडक्यात हे पहिलं स्वतंत्र न्युज पोर्टल आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एका माध्यम समूहाने इतर माध्यम समूहातील पत्रकारांचा गौरव करत त्यांना कौतुकाची थाप दिली आहे.
हा सन्मान सोहळा पुण्यातील JW Marriot हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सोबतच इतर पुरस्कर्ते देखील उपस्थित होते.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत