सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-कुर्डुवाडी सेक्शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान 26.33 किमीचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे नॉन इंटरलॉकींगच्या कामकरिता ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येत आहे.
ता. 14 ऑक्टोबर या कामास सुरवात होणार आहे. तब्बल 14 दिवस ब्लॉक घेऊन काम केले जाणार आहे.ब्लॉक घेण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. सोलापूर विभागातून धावणा-या 15 गाड्या रद्द तर 35 गाड्यांच्या मार्गात बदल/मार्ग परिवर्तन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
रद्द करण्यात आलेल्या एक्सप्रेस गाड्या –
मुंबई-गदग, गदग-मुंबई, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर, मुंबई-लातूर, लातूर-मुंबई, मुंबई-बिदर, बिदर-मुंबई, म्हैसूर-साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी-म्हैसूर, नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड हैद्राबाद-हडपसर, बिदर-मुंबई, पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा यापूर्वीच ता. 17 ऑक्टोबरपर्यत रद्द करण्यात आली आहे. आता ता. 28 ऑक्टोबरपर्यत रद्द करण्यात आली आहे.
मार्ग परिवर्तन (बदल) करण्यात आलेल्या एक्सप्रेस गाड्या –
00101 सांगोला-आर्दशनगर (दिल्ली) किसान रेल्वे ही कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
00109 सांगोला-मुजफ्फरपुर किसान रेल्वे कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
00123 सांगोला-शालीमार किसान रेल्वे कुर्डुवाडी, लातूररोड, परभणी, पूर्णा, अकोला बडनेरा मार्गे धावेल.
01201 लोकमान्य टिळक टर्मिनल-मदुराई रोहा, मडगॉव, मंगलूरू, शोरनूर, पालगट, ईरोड, तिरूच्चिराप्पल्लि कोट्टै मार्गे धावेल.
01202 मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनल तिरूच्चिराप्पल्लि कोट्टै, ईरोड, पालगट, शोरनूर, मंगलूरू, मडगांव, रोहा मार्गे धावेल.
02882 भुनेश्वर-पुणे वाडी, सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
02881 पुणे-भुनेश्वर पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, वाडी, मार्गे धावेल.
06340 नागरकोईल-मुंबई दिंडुक्कल, नामक्कल, ईरोड, पालगट, शोरनूर, मंगलूरू, मडगांव, रोहा, पनवेल, ठाणे मार्गे धावेल.
06339 मुंबई- नागरकोईल ठाणे, पनवेल, रोहा, मडगांव, मंगलूरू, शोरनूर, पालगट, ईरोड, नामक्कल,दिंडुक्कल, मार्गे धावेल.
06352 नागरकोईल-मुंबई तिरूच्चिराप्पल्लि, ईरोड, पालगट, शोरनूर, मंगलूरू, मडगॉव, रोहा, पनवेल, ठाणे मार्गे धावेल.
06351 मुंबई- नागरकोईल ठाणे, पनवेल, रोहा, मडगॉव, मंगलूरू, शोरनूर, पालगट, ईरोड, तिरूच्चिराप्पल्लि मार्गे धावेल.
08519 विशाखापट्टनम-एलटीटी विकाराबाद, नांदेड, मनमाड, इगतपुरी मार्गे धावेल.
08520 एलटीटी-विशाखापट्टनम इगतपुरी, मनमाड, नांदेड, विकाराबाद, मार्गे धावेल.
06229 म्हैसूर-वाराणसी रायचूर, सिकंदराबाद, बल्हारशाह, नागपूर, इटारसी मार्गे धावेल.
06230 वाराणसी- म्हैसूर इटारसी, नागपूर, सिकंदराबाद, रायचूर, मार्गे धावेल.
09054 अहमदाबाद-चैन्नई सुरत, जलगाव, भुसावळ, वर्धा, बल्हारशाह, सिकंदराबाद, रायचूर मार्गे धावेल.
09053 चैन्नई-अहमदाबाद रायचूर, सिकंदराबाद, बल्हारशाह, वर्धा, भुसावळ, जलगाव, सुरत, मार्गे धावेल.
09220 अहमदाबाद-चैन्नई सुरत, जलगाव, भुसावळ, वर्धा, बल्हारशाह, सिकंदराबाद, रायचूर मार्गे धावेल.
09219 चैन्नई-अहमदाबाद रायचूर, सिकंदराबाद, बल्हारशाह, वर्धा, भुसावळ, जलगाव, सुरत, मार्गे धावेल.
01017 एलटीटी-करिकल पुणे, मिरज, हुबळी, यंशवतपूर, जोलारपेट्टै, काटपाडी, वेलूर, विलूप्पुरम मार्गे धावेल.
01018 करिकल-एलटीटी विलूप्पुरम, वेलूर, काटपाडी, जोलारपेट्टै, यंशवतपूर, हुबळी, मिरज, पुणे मार्गे धावेल.
06502 यंशवतपूर-अहमदाबाद रायचूर, सिकंदराबाद, बल्हारशाह, वर्धा, जळगाव मार्गे धावेल.
06501 अहमदाबाद- यशवंतपुर जळगाव, वर्धा, बल्हारशाह, सिकंदराबाद, रायचूर मार्गे धावेल.
02755 राजकोट-सिकंदराबाद पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे धावेल.
02756 सिकंदराबाद- राजकोट सोलापूर, कुर्डुवाडी, पुणे, मिरज मार्गे धावेल.
07204 काकिनाडा-भावनगर सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे, मार्गे धावेल.
07203 भावनगर- काकिनाडा पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, मार्गे धावेल.
07221 काकिनाडा पोर्ट-एलटीटी सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे, मार्गे धावेल.
07222 एलटीटी- काकिनाडा पोर्ट पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, मार्गे धावेल.
09016 इंदोर- लिंगमपल्ली पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, मार्गे धावेल.
09015 लिंगमपल्ली-इंदोर सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे, मार्गे धावेल.
09120 केवडिया-चैन्नई पुणे, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर, मार्गे धावेल.
09119 चैन्नई- केवडिया सोलापूर, कुर्डुवाडी, मिरज, पुणे, मार्गे धावेल.
01302 बेंगलुरू-मुंबई उद्यान मुंबई स्थानकापर्यत धावण्याऐवजी सोलापूर स्थानकापर्यत धावेल.
01301 मुंबई- बेंगलुरू उद्यान मुंबई स्थानकावरून न सुटता सोलापूर स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद