Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > दयानंद रेवडकर यांना राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

दयानंद रेवडकर यांना राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

दयानंद रेवडकर यांना राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
मित्राला शेअर करा

AISF वैद्यकीय समिती यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र राज्य 2022 चा आदर्श क्रिडा शिक्षक महाराष्ट्र राज्य पुरस्कार दयानंद रेवडकर यांना जाहीर झाला आहे.

शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,येडशी येथे कार्यरत असणारे दयानंद रेवडकर हे सतत क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असतात. क्रिडा क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल घेत AISF वैद्यकीय समितीच्या वतीने त्यांना आदर्श क्रिडा शिक्षक महाराष्ट्र राज्य 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

दयानंद रेवडकर सर सतत करत असलेल्या क्रिडा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरीक व मानसीक विकास उत्तम होत असल्या कारणाने समाजाला त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा प्रोत्साहन आत्मविश्वास मिळावा व त्यांची आणि समाजाची कार्य क्षमता वाढावी या साठी दयानंद रेवडकर यांना राज्यस्तरीय आदर्श क्रिडा शिक्षक महाराष्ट्र राज्य 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार सोहळ्याचे थेटप्रसारण तसेच लॉईव्ह ऑनलाईन मुलाखत सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल वर घेण्यात येणार आहे. हा पुरस्कार 5 सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

खुलताबाद, संभाजीनगर या ठिकाणी हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती AISF वैद्यकीय समिती महाराष्ट्र पुरस्कार नियोजन समितीने दिली.