-: अभंग :-
आले आले रे हरीचे डिगर |
वीर वारकरी पढरीचे ||
ज्याची चरण धुळी उधळे गगनपथे |
ब्रम्हदिका तेथे जाली वाटी ||
एकमेका पुढे लवविता माथे |
म्हणती आम्हा ते लागो रज ||
भक्ती प्रेमभाव भरले ज्याची अंगी
नाचती हरि रंगी नेणती लाजू ||
तेर प्रतिनिधी :- हरी खोटे
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता धाराशिव येथील राज्यभरातील लाखो भाविक भक्तांसह वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांच्या पायी पालखी सोहळ्याचे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूरातील कार्तिक सोहळ्यासाठी रविवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीजे दिवशी संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिरांतून वारकरी भाविक भक्तांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुपारच्या सुमारास शेकडो वारकऱ्यांच्या लवाजम्यासह टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाचा जयघोष करत मजल दर मजल करत पंढरपूर येथील कार्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मार्गस्थ होणार असल्याचे गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी हा पालखी सोहळा दि. ३ हिंगळजवाडी, दि. ४ धाराशिव, दि. ५ भातंबरे, दि.६ वैराग, दि.७ यावली, दि.८ खैराव, दि ९ अनगर, दि १० नोव्हेंबर रोजी रोपळे येथील मुक्कामानंतर, सोमवार दि. ११ रोजी गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे कार्तिक सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या काठी दाखल होऊन संत गोरोबा काका मठातील पाच दिवसांच्या मुक्कामानंतर शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने म्हणजेच स्वगृही परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन येवती, खंडोबाचीवाडी, कुंभेज, कापसेवाडी, काळेगाव, साकत, पिंपरी, कौडगाव, सांजा, काजळा, मार्गे मजल दर मजल करत रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी गोरोबा काकांच्या पायी पालखी सोहळ्याचे तेर नगरीत आगमन होणार आहे विशेष म्हणजे या पायी पालखी सोहळ्यात ठिक ठिकाणी नामवंत कीर्तनकाराची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.
विशेष म्हणजे ज्या भाविक भक्तांसह नागरिकांना पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे आशा भाविक भक्तांसह नागरिकांनी मंदिर ट्रस्ट कडे रितसर नोंदणी करण्याचे आव्हान संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकारी सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती रुपाली कोरे, निरिक्षक अतुल नळणीकर, मंदिराचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी