Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील

कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील

कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
मित्राला शेअर करा

तेर प्रतिनिधी – हरी खोटे

धाराशिव तालुक्यातील तेर व परिसराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून तेर येथे विकास कामे सुरु आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी महायुती सरकारने केलेल्या विकास कामाचे लोकांना माहिती देत पुढील काळातील विकास कामे करण्यासाठी त्याचबरोबर महायुतीच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशी सुचना महायुतीचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

रविवार दि 27 रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तेर ता. धाराशिव येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आ. पाटील बोलत होते.

तेरणा कालव्याचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे संत गोरोबा मंदिर विकास कामाचे नुकताच शुभारंभ झाला आहे पुराणवस्तू संग्रहालयाचे काम पूर्णत्वास जात आहे. श्री. त्रिविक्रम मंदिरा चे सर्व कामे पूर्ण झाल्यावर गावच्या विकासासह सौंदर्यात भर पडणार आहे त्याचबरोबर भारत देशासह परदेशातून हजारो पर्यटक इतिहास प्रेमी संशोधक भाविक तेर येथे येतील व यांचा व्यावसायिकांना ही फायदा होईल असेही यावेळी आ. पाटील यांनी सांगितले.

या निवडणुकीत तेर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर मोठी जबाबदारी असून स्वतः उमेदवार समजून घराघरात मतदारांपर्यंत जाऊन त्यांना विकासकामांची, सरकारच्या लाभाच्या योजनांची माहिती द्यावी. तेर येथून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहनही राणाजगजितसिंह पाटील यांनी केले यावेळी श्रीमंत फंड, नवनाथ नाईकवाडी, पद्माकर फंड, रवि चौगुले, बाळासाहेब वाघ, विठ्ठल लामतुरे, आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते