Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > उपमुख्यमंत्री कार्यालय सहसचिव, I A S संतोष पाटील यांच्या उपस्थितीत जय शिवराय प्रतिष्ठान बार्शी शिवदीप महोत्सव साजरा

उपमुख्यमंत्री कार्यालय सहसचिव, I A S संतोष पाटील यांच्या उपस्थितीत जय शिवराय प्रतिष्ठान बार्शी शिवदीप महोत्सव साजरा

उपमुख्यमंत्री कार्यालय सहसचिव, I A S संतोष पाटील यांच्या उपस्थितीत जय शिवराय प्रतिष्ठान बार्शी शिवदीप महोत्सव साजरा
मित्राला शेअर करा

सालाबाद प्रमाणे याही वर्षी जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शिवदीप महोत्सवाच आयोजन करण्यात आले होते तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी I A S अधिकारी बोलवण्याची परंपरा या माध्यमातून कायम राहिली.

या कार्यक्रमासाठी उंडेगावचे सुपुत्र I A S अधिकारी उपमुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्राचे सहसचिव श्री संतोष पाटील साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले तर इतर मान्यवरांमध्ये तालुका कृषी अधिकारी माढा श्री भारत कदम साहेब, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. भारतीताई रेवडकर मॅडम, स्मार्ट ॲकॅडमीचे अध्यक्ष श्री सचिनजी वायकुळे सर, ॲड श्री महेश जगताप साहेब, ॲड प्रशांत एडके साहेब, ॲड सौ राजश्री ताई डमरे तलवाड हे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवचरणी दीप प्रज्वलित करून शिवदीप महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांबरोबर असंख्य शिवभक्तांनी देखील मूर्ती परिसरामध्ये दीप प्रज्वलित केली. शेकडो दिवे आणि मशाली व फुलांच्या सजावटीमुळे मूर्ती परिसर अतिशय मनमोहक दिसत होता. याचबरोबर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी आयएस अधिकारी श्री संतोष पाटील साहेब यांनी मनोगत व्यक्त केले की, समाजामध्ये कृतीतून शिव विचार रुजवणाऱ्या संघटना समाज घडवू शकतात याचे उत्तम उदाहरण जय शिवराय प्रतिष्ठान आहे असं मत साहेबांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर बार्शीकरांसाठी सामाजिक क्षेत्रात काम करणारे असंख्य युवक हे प्रेरणादायी आहेत असं मत प्राचार्य सौ भारतीताई रेवडकर मॅडम यांनी व्यक्त केलं. तर श्री सचिन वायकुळे सरांनी बार्शीतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक संघटना या समाजासाठी आदर्शवत आहेत असं मत व्यक्त केलं. यावेळी एकविराई मर्दानी आखाडा, बार्शीतील हर हर महादेव या चित्रपटात काम करणाऱ्या ५६ कलाकारांचा मान्यवरांच्या शुभहस्ते जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी बार्शी शहरातील विविध संघटनेतील पदाधिकारी, महिला, युवक, युवती उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी जय शिवराय प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.