नळदुर्ग : येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक्षक श्री. धनंजय पाटील यांची ऑल इंडीया कॉलेज अँड युनिव्हर्सिटी एम्पलॉईज फेडरेशन च्या सदस्यपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री. धनंजय पाटील यांनी यापूर्वी देखील अनेक शिक्षेकेतर संघटनेवर पदाधिकारी म्हणून काम केले आहे त्यांची काम करण्याची पध्दत पाहूनच त्यांची या जागेवर वर्णी लागली आहे. त्यांच्या या निवडीमुळे आपल्या जिल्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर काम
करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे पधाधिकारी महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग, मित्रपरिवार व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ