महाराष्ट्र लोकसेवा आयोगा ( mpsc ) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत दत्तात्रय मारुती गायकवाड यांची सहाय्यक अभियंता वर्ग-2 जलसंधारण विभाग या पदावर निवड झाली आहे. दत्तात्रेय गायकवाड यांनी या परीक्षेत पाहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे.

दत्तात्रय गायकवाड हा मूळचा बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव या गावातील असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ग्रामीण भागात आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण जय मल्हार हायस्कूल धस पिंपळगाव येथे झाले आहे तर अकरावी व बारावी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे झाले आहे. पदवी शिक्षण ( बी. इ. सिव्हील) स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे पूर्ण केले. त्याच्या या यशामध्ये त्याचे वडील मारुती गायकवाड व भाऊ बालाजी गायकवाड व कुटुंबिय यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले.
या निवडीबद्दल बार्शी शहर व जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी व मित्रांनी दत्ता गायकवाड यांचेअभिनंदन केले आहे.
More Stories
राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतासप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन