Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > सोलापूरचा बॉडीबिल्डर पंचाक्षरी लोणार ने पटकावला मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत द्वितीय क्रमांक

सोलापूरचा बॉडीबिल्डर पंचाक्षरी लोणार ने पटकावला मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत द्वितीय क्रमांक

ऐतिहासिक यश सोलापूर च्या पंचाक्षरी ( पंचू ) लोणार यांनी मिस्टर युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल घेऊन दुसरा क्रमांक पटकावला
मित्राला शेअर करा

अभिमान सोलापूरचा. ऐतिहासिक यश सोलापूर च्या पंचाक्षरी ( पंचू ) लोणार यांनी मिस्टर युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल घेऊन दुसरा क्रमांक पटकावला. पुणे येथे झालेल्या मि. युनिव्हर्स स्पर्धेत 65 की गटात सिल्व्हर मेडल घेऊन सोलापूर जिल्ह्यातील बॉडी बिल्डिंग क्षेत्रात हे उज्वल यश मिळवणारा लोणार हा पहिलाच बॉडी बिल्डर ठरलाय. लोणार यांनी हे यश त्यांची प्रचंड मेहनत कष्ट चिकाटीसोबतच त्यांचे गुरू अनवर सरांचे अनमोल मार्गदर्शन BRDS चे रविंद्र पाटील याच्या साथीने साध्य केले.

https://www.instagram.com/p/Cce1C7RrcyD/?igshid=YmMyMTA2M2Y=

या पूर्वी पंचु लोणार यांनी पाश्चिम महाराष्ट्र श्री, महाराष्ट्र श्री ग्रुप विनर व बेस्ट पोजर विजेता, राजीव श्री 2022 असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.

“माझ्या यशाचा कोणताही सीक्रेट फॉर्म्युला नाही. मी हेवी वेट उचलतो, हेवी वर्काउट करतो आणि सर्वोत्तम बनण्याचे ध्येय ठेवतो.” “एकदा तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल, की सर्वात कठीण गोष्ट म्हणजे ती थांबवणे.” असे उत्तम संदेश ते सोशल मीडिया च्या माध्यमातून ते तरुणांना देतात. युनिव्हर्स बॉडीबिल्डर रौप्य पदक 2022 विजेता. विजयाची व्याख्या जय-पराजयाने होत नाही, ती परिश्रमाने परिभाषित केली जाते अश्या शब्दात त्यांनी या विजयाबद्दल सर्वांचे आभार मानले.

पंचाक्षरी लोणार यांचे हे यश सोलापूरकरांनसठी आनंदाची व अअभिमानाची बातमी आहे. सोलापूरचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल तमाम सोलापूरकरांच्या वतीने पंचाक्षरी लोणारचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.