बार्शी:- नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल बार्शी मधील इयत्ता 8 मधे शिकत असून, विद्यार्थी ध्रुवा पाटील याने पाचवा क्रमांक पटकावला आहे. ध्रुवा ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातुन एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यातील 28 विद्यार्थी हे फिडे रेटेड होते. त्याच्या या यशाबद्दल सेंट जोसेफ शाळेचे मुख्याध्यापक फादर वर्गीस अगस्ती, व्यवस्थापक फादर रॉबिन, उपमुख्याध्यापक शेर्ली, क्रीडा शिक्षक अतुल डुरे व महेश शिंदे, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
श्री. शिवाजी महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश