Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश

निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश

निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश
मित्राला शेअर करा

निवडणूकविषयक कामकाजाचा घेतला आढावा

धाराशिव,दि.२५:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने यंत्रणांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या जबाबदाऱ्या यंत्रणांनी चोखपणे पार पाडाव्यात असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले.

आज २५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा आयोजित बैठकीत घेतला.यावेळी श्री. गावडे बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधिक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपायुक्त जगदीश मनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व उपजिल्हा निवडणूक अधिकारी उदयसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. गावडे पुढे म्हणाले की, जिल्हयातील विविध मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सर्व सोयी-सुविध निर्माण कराव्यात.तसेच दिव्यांग, वृध्द, आजारी असणाऱ्या मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच जिल्हयात मतदान प्रक्रियेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी सजग राहावे. निवडणुक काळात समाज माध्यमांचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे.यावर विशेष लक्ष ठेवून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची सुचनाही त्यांनी केली. मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमांची मोठया प्रमाणात अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच आचारसंहिता भंगाच्या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणांनी ॲटिव्ह मोडवर काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी जिल्हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहितीही यावेळी त्यांनी दिली. जिल्हयातील संवेदनशील असलेल्या ६ मतदान केंद्रावर विशेष लक्ष असल्याचे सांगून मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आतापर्यंत सी-व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ३ तक्रारी प्राप्त झाल्या आहे त्यापैकी दोन तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. क्षेत्रनिहाय वाहतूक व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे.ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन आवश्यक प्रमाणात उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हयातील सुरक्षेबाबत पोलिस अधिक्षक श्री. जाधव यांनी माहिती दिली.त्यांनी आंतरराज्य तपासणी नाक्यावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस विभागाच्या वतीने आतापर्यंत ४९ लाख रुपये किंमतीची दारु व गुटखा यासारखा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच विविध गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही व्यक्तींवर हद्दपारीचीही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष भोर, संतोष राऊत, प्रविण धरमकर व विजया गायकवाड,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा महिला व बालविकास देवदत्त गिरी, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक गणेश बारगजे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे प्रतिनिधी एम. जी. शेख, तहसीलदार अभिजीत जगताप, ज्योती चव्हाण, निवडणूकचे नायब तहसीलदार सचिन पाटील आदी उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा मतदारसंघनिहाय केलेल्या तयारीची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यावेळी दिली.