बार्शी : बार्शी शहरात प्रथमच या वर्षी खाजगी ध्यास कोचिंग क्लास बार्शी यांचा आनंद बाजार उत्साहात पार पडला.
विशेष म्हणजे त्यांनी शाळेत आनंद बाजार आयोजित करण्यात येतो या त्या पद्धतीने आयोजन करण्यातआले. ध्यास कोंचिग क्लासेसचे संस्थापक श्री सचिन मस्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आनंद बाजार उत्साहात पार पडला. या आनंद बाजारात विवीध स्टाॅल लावले होते मुल हे सर्व स्टाॅलमधील वस्तुची देव घेव करत होती यातुन मुलांच व्यवहार ज्ञानात नक्कीच भर पडेल.
या आनंद बाजारासाठी बार्शी शहरातील सामाजिक सेवा करत विवीध संस्था, संघटना यांना सचिन मस्के सर यांनी निमंञीत केले होते. त्या संस्थेतील, संघटनेतील पदाधिकारी, सदस्य यांनी आनंद बाजाराला भेट देत मुलांचा उत्साह वाढवून खरेदी केली. तसेच सुभाषनगर भागातील नागरिकांनी देखील खरेदी करून मुलांचा उत्साह वाढवला. असे ध्यास कोचिंग क्लासेस संस्थापक सचिन मस्के यांनी सांगीतले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ