Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > डिजिटल मीडिया प्रेस क्लबची कार्यकारिणी जाहीर पदाधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट वाटप

डिजिटल मीडिया प्रेस क्लबची कार्यकारिणी जाहीर पदाधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट वाटप

मित्राला शेअर करा

बार्शी वृत्तपत्र संपादक संघ संचलित डिजिटल मीडिया प्रेस क्लब ची स्थापना करण्यात आली असून आज वृत्तपत्र संपादक संघाच्या कार्यालयांमध्ये प्रेस क्लबच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.

डिजिटल मीडिया प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी संदीप मठपती, कार्याध्यक्षपदी हर्षद लोहार, उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन धारूरकर, सचिवपदी प्रदीप माळी, खजिनदार निलेश झिंगाडे, सहसचिवपदी आजम बागवान यांची एकमताने निवड करण्यात आली.

वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष योगेश लोखंडे,पत्रकार नितीन भोसले यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.वृत्तपत्र संपादक संघाच्या कार्यालयामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

शासनाची पशुसंवर्धन योजना अर्ज भरणे सुरू, शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा;कसा कराल अर्ज

तसेच डिजिटल मीडिया च्या नवनियुक्त पदाधिकारी व महिला हक्क संरक्षण मंच यांच्या वतीने भगवंत मंदिर शनी मंदिर या ठिकाणी गरजू गरीब अनाथ वृद्ध लोकांना थंडीपासून संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी पत्रकार कदीर बागवान, सौ. सुवर्णा शिवपुरे, सौ.संगीता पवार, विजय शिंगाडे, अभिषेक काकडे, प्रभुलिंग स्वामी, प्रविण पावले, किरण नान्नजकर, श्याम गायकवाड, विनोद उमाटे, रियाज पठाण, सुवर्णा लोकरे, वैशाली ढगे, लता घोडके, सलीमुन शेख, सुनीता शिंदे उपस्थित होते.

अल्पावधीत बार्शीकरांच्या पसंतीस पात्र ठरलेले REAL News बातमी महाराष्ट्राची चे संपादक श्री.हर्षद लोहार यांची डिजिटल मीडिया प्रेस क्लबच्या कार्याध्यक्ष पदी निवड.

वृत्तपत्र संपादक संघ, बार्शी संचलित डिजिटल मीडिया प्रेस क्लबच्या कार्याध्यक्ष पदी श्री.हर्षद अशोक लोहार यांची निवड करण्यात आली आहे.

निवडीचे पत्र वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष योगेश लोखंडे, पत्रकार नितीन भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.