बार्शी – येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड 6 पदरी महामार्गाबाबत शेतकरी बंधुच्या भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करणेबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकारी यांचेसोबत चर्चा आयोजित केली होती त्यावेळी, आमदार राजेंद्र राऊत हेही उपस्थित होते.

यावेळी या महामार्गात जाणाऱ्या जमिनी व त्यांना मिळणारा मोबदला, सदरील मार्ग कोणत्या गटातून व नेमके कुणाचे किती क्षेत्र जाणार याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच या मार्गामुळे शेतकऱ्यांना शेतातील रस्त्याच्या अडचणी, पाईपलाईनच्या समस्या, तसेच या मार्गावर होणारे टोल व त्याबाबच्या सुविधा अशा अनेक समस्यांवर चर्चा व उपाययोजना काय आहेत, यावर अधिकारी वर्गांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या मनात असणाऱ्या शंका व समस्या याचे निराकरण व समाधान करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक चिटणीस, भूसंपादन अधिकारी राजकुमार माने, भूसंपादन अधिकारी सोलापूर, तहसीलदार तुळजापूर सौदागर तांदळे, बार्शी तहसीलदार शेरखाने, तहसीलदार परंडा, भूमी अभिलेखचे मानेही उपस्थित होते.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर