महाराष्ट्र विद्यालयाकडून कु. प्राजक्ता जगताप हिचा सत्कार दिनांक १९/२/२०२२ वार सोमवार रोजी महाराष्ट्र विद्यालयात कु. प्राजक्ता जगताप हिने नीट परीक्षा मध्ये यश संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार श्री. जयकुमार शितोळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य जी. ए. चव्हाण हे होते सोबत उपप्राचार्य एल. डी. काळे होते.
कुमारी प्राजक्ता जगताप ही महाराष्ट्र विद्यालयाची माजी विद्यार्थीनी आहे. कु. प्राजक्ता जगताप या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत ६५५ गुण मिळावून शासकीय एम. बी. बी. एस. काॅलेजला प्रवेश मिळवला तिच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी व महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांच्या वतीने तिचा वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राजक्ताने आपले मनोगत व्यक्त करताना नीट परीक्षांमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी व अभ्यास कशा पद्धतीने करावा याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बागल यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश क्षिरसागर यांनी केले.
More Stories
रत्न आभूषण उद्योगात महिला उद्योजकांना येण्यास प्रोत्साहन द्यावे : राज्यपाल रमेश बैस
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जुलूस