बार्शी : सोलापूर जिल्हा चेस असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बार्शीच्या प्रसन्न विद्याधर जगदाळे याने जिल्ह्यात पाचवा तर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले. पंधरा वर्षे वयोगटात बार्शीच्या सान्वी गोरे हिने हे प्रथम क्रमांक मिळवला. याच वयोगटात अनन्या उलभगत ही तिसरी आली.

दहा वर्षा खालील वयोगटात नोमन करमाळकर या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक मिळविला. सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत दहा वर्ष, पंधरा वर्षे वयोगटातील सामन्यासह खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते.
प्रसन्न जगदाळे याने अंतिम सामन्यात ७ पैकी ५.५ गुण मिळवत हे उज्वल यश मिळवले. या विद्यार्थ्यांना बार्शीच्या नितीन अग्रवाल यांच्यासह सोलापूरच्या सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ