सोलापूर ग्रामीण दिनांक 109/2021 सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 41 चालक पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरीता सन 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती . त्यांची लेखी परीक्षा दिनांक 01/10/2021 रोजी विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे .
सदर परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र ( HALL TICKET ) दिनांक 25/09/2021 पासून ई – मेलवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . तसेच सदरचे प्रवेशपत्र
या पोर्टलवरुन देखील डाऊनलोड करता येतील . उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता प्रवेशपत्रावर वेळ व परीक्षा केंद्र तसेच परीक्षाबाबतच्या सुचना नमुद करण्यात आले आहेत , त्यानुसार परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित राहावे . उमेदवारांना प्रवेशपत्र ( HALL TICKET ) डाऊनलोड करताना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी खालील नमुद दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकावर ( हेल्पलाईन नंबरवर ) संपर्क साधावा .
1. मदतीसाठी संपर्क क्रमांक :
9699792230
8999783728
9309868270
2. नियंत्रण कक्ष , सोलापूर ग्रामीण : 0217-2732000 / 0217-2732010
उमेदवार खाली दिलेल्या पध्दतीने हॉल तिकीट डाऊनलोड / प्राप्त करु शकतो .
- उमेदवाराच्या नोंदणीकृत ई – मेलवर हॉल तिकट डाऊनलोडलिंक पाठवली जाईल.हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा .
- http://bit.ly/3o4yW5h
या लिंकवर क्लिक करुन युझरनेम आणि पासवर्ड वापरुन लॉगिन मधून हॉल तिकीट डाऊनलोड करा . - http://bit.ly/3o4yW5h या लिंकवरील ” डाऊनलोड हॉल तिकीट ” या बटनावर क्लिक करुन ऍडमिटकार्ड डाऊनलोड करण्यासाठी अॅप्लिकेशन आयडी / आधारकार्ड नंबर / मोबाईल नंबर / ई – मेल आयडी आणि जन्म तारीख अर्जात भरल्याप्रमाणे प्रविष्ट करुन हॉल तिकीट डाऊनलोड / प्राप्त करु शकतात. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण यांच्याकडून देण्यात आली आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद