मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडुन मोठय़ाप्रमाणात जिवीत हानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “ दामिनी ” ॲप तयार केले असुन सदरचे अँप Google Play Store वर उपलब्ध आहे.
खालील लिंक वर क्लिक करून दामिनी ॲप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini
सदरचे अँप GPS लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. आपले ॲप मध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये तसेच इतर खबरदारीचे उपाय या ॲपच्या माध्यमातून कळतात.
सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, महसूल सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांनी सदरचे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर या बाबत माहिती घ्यावी असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत व सामान्य नागरीक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करून दामीनी अँप Play Store डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहीती द्यावी गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना सदर App Download करुन त्यामध्ये प्राप्त होणा या Alert नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास कळविण्यात यावे अश्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद