बार्शी – येथील सामाजिक कार्यामध्ये वीस वर्षापासून कार्यरत असणारे, भगवंत अंबऋषी सामाजिक संस्थेचे संस्थापक व शिवशाही व्यापारी संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावारे यांच्या वतीने डॉ बाबासाहेबांच्या जयंती निमित्त बार्शी शहर व तालुक्यातील वंचित व गरजू 2100 महिलांना साडी चोळी चा आहेर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री दिलीप सोपल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री व आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हटले की, समाजातील तळागाळातील वंचितांना न्याय देण्यासाठी धनंजय ढावारे यांच्या वतीने निःपक्षपाती केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आमचा सहभाग राहील अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

धनंजय ढावारे यांचा जन्म सामाजिक कार्यासाठी झाला असल्याचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हटले. याप्रसंगी शहरातील सामाजिक संघटनाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज शेळके व शीतल कुलकर्णी यांनी केले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर