कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या सेवानिवृत्त सेवाभावी संस्थेच्या सर्व सभासदांसाठी डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सुरवातीला कर्मवीर मामासाहेबांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ट्रॉमा युनिटसाठी देणगी देणाऱ्या दात्यांच्या सत्कार करण्यात आला. हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर जगताप यांनी ट्रॉमा युनिटची माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय यादव यांनी ट्रॉमा युनिट व हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या सुविधा याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व्ही. जी देशमुख सर, सचिव डी. बी. पाटील सर, सहसचिव आनंदराव देशमुख सर, खजिनदार राजेंद्र गायकवाड सर तसेच सर्व संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कसबे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन धोत्रे सर यांनी केले.
महाराष्ट्र विद्यालयात चित्रकला व रंगभरन स्पर्धेचे बक्षीस वितरण
जगदाळे मामांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्र विद्यालयात चित्रकला व रंगभरन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना रंगसाहित्य बक्षीस स्वरुपात देण्यात आले. ही बक्षीसे बार्शीतील अजिंक्य फार्मा, शिवसृष्टी पतसंस्था, उपसरपंच चहा, श्री दत्त भेळ, न्यू प्रेम मेन्स पार्लर, हिंदवी अर्थमुव्हर्स यांच्या वतीने देण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक जी. ए. चव्हाण यांनी अभिनंदन केले. प्रशालेच्या वतीने प्रशालेतील सेवानिवृत्त सेवक दयानंद गायकवाड यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये आलेले क्रमांक पुढील प्रमाणे रंगभरण स्पर्धा मध्ये ठोंगे वैष्णवी अमोल प्रथम क्रमांक, कंभीरे सार्थक सचिन व पाटील आदिती रवींद्र दोघात द्वितीय क्रमांक, मुठाळ स्वर्णीम सुशीलकुमार तृतीय क्रमांक, चित्रकला स्पर्धा मध्ये आवारे प्रणव प्रकाश प्रथम क्रमांक, पाटील आर्यन प्रदीप द्वितीय क्रमांक, बोटे पवन सिद्धेश्वर तृतीय क्रमांक, तसेच निबंध स्पर्धा मध्ये कुमारी गायत्री नितीन शिंदे प्रथम क्रमांक, कुमारी अंकिता खंडेराव मदने द्वितीय क्रमांक व पल्लवी शशिकांत गलांडे तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी श्रीमती खोचरे मॅडम, श्रीमती साठे मॅडम, शशिकांत लांडगे सर, तांबोळी सर, नितीन मोहिते सर, पवन जगदाळे सर, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद