Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > संपर्क तुटलेल्या त्या विमानाचे अवशेष सापडले, मुंबईतील चार प्रवासी विमानात होते

संपर्क तुटलेल्या त्या विमानाचे अवशेष सापडले, मुंबईतील चार प्रवासी विमानात होते

संपर्क तुटलेल्या त्या विमानाचे अवशेष सापडले, मुंबईतील चार प्रवासी विमानात होते
मित्राला शेअर करा

नेपाळ विमान अपघातात 16 जण ठार झाल्याची घटना घडली आहे नेपाळमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या तारा एअरलाइनच्या विमानाचे अवशेष मुस्तांग भागातील कोबानमधील डोंगरावर सापडले आहेत. या विमानात मुंबईतील 4 जण होते ते चौघे सध्या बेपत्ता आहेत. या विमानाचा संपर्क तुटला व विमान बेपत्ता असल्याच्या बातम्या काल आल्या होत्या.

नेपाळ लष्कराने बर्फवृष्टीमुळे तारा एअरच्या 9 NAET ट्विन-इंजिन विमानासाठी आणि बचाव कार्य शोधमोहीम थांबवल्यानंतर सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली.

तसेच या दुर्घटनेत आत्तापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित 6 मृतदेहांचा शोध सुरू आहे. हे विमान काल ( दि. 29 ) सकाळी नेपाळमधील पोखरा येथून जोमसोमला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. दरम्यान, या विमानात 22 प्रवाशांसह मुंबईतील 4 जण होते. ते चौघे सध्या बेपत्ता आहेत.