बार्शी प्रतिनिधी
ता. 29/05/2022 बार्शी मधून गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून गेली महिनाभरात काही प्रमाणात गाड्या चोरीला गेल्या आहेत बार्शी व ग्रामीण भागातून अश्या गाड्या चोरीला गेल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.
बार्शी मध्ये श्री शिवाजी कॉलेज रोड येथे महा ई सेवा केंद्र ऑनलाईन सेंटर चालक तसेच जनवार्ता न्यूज चे पत्रकार महादेव अंकुश वाघ यांनी दैनंदिनी वापरासाठी सन 2017 साली हिरो स्प्लेन्डर प्लस कंपणीची काळ्या रंगाची त्यावर सिल्व्हर पट्टा असलेली मोटारसायकल तिचा आर.टी.ओ.क्र. MH 13 CX6838 असा असलेली स्वतःचे नावावर घेतली होती. दि. 26/05/2022 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 09.00 वा. चे सुमारास ते श्री शिवाजी कॉलेज रोड येथिल ऑनलाईन सेंटर येथे गेले असता. त्यानंतर दिवसभर काम करुन रात्री 10.30 वा. चे सुमारास ते वैदवस्ती येथे राहणारा त्यांच्या आत्याचा मुलगा पंकज रणदिवे यांचे घरी गेले.
त्यानंतर तेथे थांबुन ते रात्री 12.15 वा. चे सुमारास फुले प्लॉट येथिल राहते घरी आले. व तेथे घराचे बाहेर रस्त्यावर वरील मोटरसायकल ही हॅन्डेल लॉककरुन उभी केली. त्यानंतर ते घरी जावुन झोपले. त्यानंतर तक्रारदार सकाळी 09.30 वा.चे सुमारास ते कामाला जाणेसाठी तयार होवुन घरातुन मोटरसायकल लावली त्या ठिकाणी आले असता, त्यावेळी हॅन्डेल लॉक करुन उभा केलेली मोटारसायल त्यांना दिसुन आली नाही.
त्यामुळे सदर मोटरसायकलचा आसपास शोध घेतला परंतु ती तक्रारदार यांची मोटरसायकलचा मिळुन आली नाही. त्यानंतर दोन दिवस तक्रारदार यांनी वरील मोटरसायलचा शोध घेतला परंतु, ती मिळुन आली नाही त्यामुळे मोटरसायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री झाल्याने महादेव वाघ यांनी आजरोजी पोलीस ठाणेस तक्रार दिली. त्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अश्या चोरांवर सबंधित प्रशासनाने यावर लवकरात लवकर काही उपाययोजना कराव्यात असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी सुद्धा आपले वाहणे पार्किंग करताना थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर