मुंबई : केंद्र शासनाची आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या म.ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्रच्या कक्ष प्रमुखपदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्तीचा आदेश राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच जारी केला.केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि म.ज्योतीराव फुले योजने अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत लाभ सर्व सामान्य जनतेला मिळवून देणारी योजना या दोन्ही योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षाचा कारभार मुंबईतील वरळी येथील जीवनदायी भवन येथून चालेल.
डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून प्रभावी काम केले होते. त्या काळात त्यांनी केलेल्या कार्याचे राज्यभरातून कौतुक झाले होते.त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचे स्वीय सचिव म्हणून प्रभावीपणे केले आहे.
More Stories
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत
कोरफळे येथील शेतकरी निलेश पवार यांनी दिले हरणाचे पाडस जीवदान
आज ११ वाजता बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रम