Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
मित्राला शेअर करा

दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सेंट मेरी स्कूल नेवासा येथे झालेल्या विभागीय व्हॉलीबॉल च्या निवड चाचणीतून महाराष्ट्र विद्यालयातील 14 वर्षे वयोगटातील दोन खेळाडूंची क्रीडा संकुल वर्धा येथे होणाऱ्या 14 वर्ष मुलांच्या वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी चिं. आर्यन शिवाजी जाधवर व चिं. पुरुराज पुष्कराज पाटील या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री.वाय.एस.उपळकर, श्री.ए.वाय. पाटील,श्री.पी.डी.पाटील, श्री.शिवराज बारंगुळे, आदित्य माने यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष मार्गदर्शन प्रा. सुरेश लांडगे सर यांचे लाभले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. श्री.बी. वाय.यादव साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. नंदनजी जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव मा.श्री.पी. टी.पाटील साहेब,संस्थेचे सहसचिव मा. श्री. अरुणजी देबडवार सर, संस्थेचे खजिनदार मा. श्री. बापूसाहेब शितोळे, संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, विद्यालयाच्या शाळा समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक श्री. आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री. एस. सी. महामुनी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.