Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > डॉ. प्रसन्न पवार यांचे उत्तुंग यश

डॉ. प्रसन्न पवार यांचे उत्तुंग यश

डॉ. प्रसन्न पवार यांचे उत्तुंग यश
मित्राला शेअर करा

बार्शी:- येथील डॉ. प्रसन्न उल्हास पवार यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय दंत महाविद्यालयातून एम. डी. एस. (कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ) परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यांनी हे उज्ज्वल यश पहिल्याच प्रयत्नात संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल अनेक सामाजिक संघटनासह येथील डॉक्टरांनीही अभिनंदन केले.

देना बँकेचे निवृत्त वरिष्ठ शाखाधिकारी उल्हास पवार यांचे सुपुत्र तर येथील निवृत्त उपजिल्हाधिकारी स्व. वसंतराव पवार यांचे ते नातू आहेत. डॉ. प्रसन्न पवार यांनी संगमनेर येथील दंत महाविद्यालयातून बी. डी. एस. परीक्षेत यश मिळविले. त्यानंतर त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालयातून घेतले. डॉ. पवार यांनी या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवत महाविद्यालयात दुसरा क्रमांक प्राप्त केला.

प्रसन्न पवार यांनी उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र जगताप, डॉ. बी. वाय. यादव, डॉ. एच. डी. काळे, डॉ. योगेश सोमाणी, डॉ. विलास वाघमारे, उद्योजक गिरीष झंवर, जीवनज्योत संघटनेचे अजित कुंकूलोळ, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. गिरीष काशीद यांनी डॉ. पवार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.