Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी – बार्शीचे आमदार राजेंद्र

अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी – बार्शीचे आमदार राजेंद्र

अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी - बार्शीचे आमदार राजेंद्र
मित्राला शेअर करा

बार्शी : तालुक्यात अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.

बार्शी तालुक्यात सतत पडत असलेल्या अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.

या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सोलापूर जिल्हाधिकारी तसेच बार्शी तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे.

यापूर्वी आमदार राऊत यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी अशी रास्त मागणी सरकारकडे केली आहे त्यांच्या मागणीला यश येवो व कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेला बळीराजा मुक्त होवो याच सर्व शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा.