बार्शी येथील शिवशक्ती मैदानावर यशवंत विद्यालय खांडवी व कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय खो खो स्पर्धा 3 व 4 सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये एकूण मुलांच्या मुलींच्या 81 संघाने भाग घेतला या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटना वेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ चे खजिनदार जयकुमार (बापू )शितोळे, यशवंत विद्यालय खांडवीचे संस्थापक अध्यक्ष श्री कौरव आप्पा माने क्रीडा संयोजक प्रा. संजय पाटील प्रा. डॉ. सुरेश लांडगे, शं. नि. अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य दीपक गुंड यशवंत विद्यालय खांडवीचे मुख्याध्यापक श्री. एस. बी. शिंदे सर, कॉलेज ऑफ एज्युकेशन चे प्रा. डॉ. अनिल कांबळे, गुळपोळीचे मुख्याध्यापक पप्पू देशमुख सर प्रा. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन देशमुख सर बांधकाम व्यावसायिक महादेव देशमुख प्राध्यापक मारकड सर सतीश देशमुख सर प्रताप माने सर प्रा. बारसकर सर मान्यवर उपस्थित होते.
वरील कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रूपाली शिंदे मॅडम कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जाधव पी. टी. सर व शेवटी सर्वांचे आभार प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री. संतोष खोगरे यांनी मानले.
या स्पर्धेच्या वेळी यशवंत विद्यालय खांडवी चे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीची प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर