भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या वतीने पुतळा पार्क परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शंकेश्वर बाग परिसर रोड, हांडे गल्ली चौक, पार्किंग एरिया, कोर्ट परिसर तसेच पुतळा पार्क परिसर येथील स्वच्छता करण्यात आली. रविवारी सकाळी ६ ते ९ या वेळेत ही स्वच्छता करण्यात आली.
शिवजयंती निमित्त देखील वृक्ष संवर्धन समिती मार्फत अशाच प्रकारच्या स्वच्छता सप्ताहाचे अयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते. बार्शी मध्ये वृक्ष संवर्धन समिती ही हरित बार्शी स्वच्छ बार्शी सुंदर बार्शी या त्यांच्या ब्रिदवाक्याप्रमाणे गेली तीन वर्षापासुन काम करत आहे. लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जागरुकता निर्माण व्हावी तसेच लोकांचा या कार्यात सहभाग वाढावा व आपले शहर स्वच्छ व सुंदर व्हावे तसेच महापुरुषांना विचारांची आदरांजली वाहुन त्याच्या जयंत्या साजऱ्या व्हायला हव्यात हाच उद्देश या मागचा आहे. या वेळी वृक्ष संवर्धन समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. विषेश बाब म्हणजे महिला भगिनींनी या मोहिमेत मोठा सहभाग घेतला.
परिसर स्वच्छ केल्या नंतर पुतळा पार्क मधील महात्मा गांधी, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख, पंडित जवाहरलाल नेहरु, काकासाहेब झाडबुके यांच्या पुतळ्यावर गुलाब पाणी टाकुन ते स्चच्छ धुवुन घेण्यात आले.शेवटी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन या स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली.
या वेळी बार्शी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, आर.पी.आय.चे शहराध्यक्ष ऍडव्होकेट अविनाश गायकवाड, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, अतुल पाडे, सायरा मुल्ला ताई, सौ. शोभा घुटे आदी उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेत सचिन शिंदे, उमेश नलवडे, डॉ.सचिन चव्हाण,राणादादा देशमुख, अक्षय घोडके, राहुल तावरे,संतोष गायकवाड, डॉ.प्रविन मिरगने, डॉ. विनायक हागरे, डॉ. श्रीराम देशमुख, डॉ.विजयसिंह पवार, बाबासाहेब बारकुल, रुषिकांत पाटिल,महेश बकशेट्टी,सौदागर मुळे, संदिप ढेंगळे, तेजस विधाते, भैय्या थोरबोले, सुमित खुरंगुळे, गणेश कदम, गणेश रावळ, शशी पोतदार, उदय पोतदार,
योगेश गाडे,सागर क्षिरसागर, सुनिल फल्ले, अजित नडगिरे, रेखा विधाते, अनुसया आगलावे, आशादेवी स्वामी, रागिणी झेंडे, सुनिता गायकवाड, शबाना खान आदींनी सहभाग नोंदविला.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत