कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आणि बार्शीचे शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीत गुरुवारी दीनदयाळ उपाध्याय रोजागार मेळावा होणार आहे. यात सोलापूर औद्योगिक परिसरातील एकूण दहापेक्षा जास्त कंपन्यांत एकूण १३०० पेक्षा जास्त पदे भरली जातील.
सर्व रिक्तपदे किमान दहावी, १२ वी, जाताल. सर्व रिक्तपद किमान दहावी, १२ वी , पदवीधर, बी.ए., बी.कॉम, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बी. एस्सी, एम. एस्सी, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, आय. टी. आय. आदी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी याद्वारे विविध संधी आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. व पाच जानेवारी रोजी शिवाजी महाविद्यालय, शिवाजी नगर, बार्शी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी (०२१७२९५०९५६) या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले