सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शीच्या वतीने दिले जाणारे कै बाबुरावजी डिसले जीवन गौरव पूरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
कै शिवाजीराव डिसले शेठ यांच्या जयंती निमित्त या पूरस्काराचे आयोजन सोमवार दि 09/01/2023 रोजी शिवप्रभा संकुल, नागोबा चौक, बार्शी तुळजापूर रोड, रूई ता बार्शी याठिकाणी सायंकाळी ठीक 5.00 वाजता करण्यात आले आहे असे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कापसे यांनी सांगितले.
या पूरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, हार, बुके, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह आहे असे मंडळाचे सचिव श्री प्रताप दराडे यांनी सांगितले.
पुरस्कार पुढीलप्रमाणे
1) महिला भुषण पूरस्कार – मा. प्रा. डॉ. महानंदा बाळासाहेब बगले (मडसनाळ) – आपण एम.एस्सी.बी.एड. पी.एच.डी. प्राणीशास्त्र विषयात अधिव्यख्याता, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर, महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. विभाग प्रमुख, विवेकानंद साहित्य संमेलन- एन.सी.सी. समन्वयक, महाराष्ट्र कराटे अॅण्ड किक बॉक्सिंग फेडरेशन- समन्वयक, छळ प्रतिबंध समिती सदस्य, महिला समिती सदस्य, राष्ट्रीय योजना समिती सदस्य, सायन्स असोसिएशन सदस्य, युवती संमेलन समिती सदस्य, प्लेसमेंट समिती सदस्य, हरित सेना महाराष्ट्र शासन वनविभाग सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य, महिला सिटींग अरेजमेंट समिती सदस्य, शोध निबंध- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जनरल मधुन प्रसिद्ध १० राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय संशोधन एकुण ६ पोस्टर प्रझेन्टेशन, असे अनेक सर्वांगिण कार्याच्या माध्यमातून महिला भुषण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
2) शैक्षणिक पूरस्कार – मा. श्री. दुधाजीराव दराडे, (बार्शी) – आपण आय. टी. एम. व्होकेशनल युनिव्हर्सिटी, गुजरात आणि संदिप युनिव्हर्सिटी, नाशिक चे बोर्ड ऑफ स्टडीज मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सदस्य, अभ्यासक्रम विकास मंडळाचे सदस्य, राजारामनगर, इस्लामपूर, आजीवन सदस्य, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, वरिष्ठ सदस्य इंडियन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स सदस्य, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स, व्यावसायिक सदस्य अभियांत्रिकी टुडे, चेन्नई, सहयोगी सदस्य, इंटरनॅशनल सोसायटी फॉर स्ट्रक्चरल अँड मल्टीडिसिप्लिनरी ऑप्टिमायझेशन, सहयोगी सदस्य, युनिव्हर्सल असोसिएशन ऑफ मेकॅनिकल अँड एरोनॉटिकल इंजिनियर्स, सहयोगी सदस्य, संशोधन अभियंता आणि डॉक्टर संस्था सदस्य, प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि अकादमीच्या उद्दिष्टंना मान्यता देण्यासाठी इंटरनॅशनल अॅकॅडमी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एज्युकेशन अँड रिसर्च ३२ आंतरराष्ट्रीय जर्नल्स, ०१ राष्ट्रीय जर्नल, १८ आंतरराष्ट्रीय परिषद आणि १५ राष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन कार्य प्रकाशित एकूण प्रकाशने ७४ 09 रिसर्च स्कॉलर्सने पीएच.डी पूर्ण केली आणि ०५ रिसर्च स्कॉलर्स पीएच.डी. साठी कार्यरत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, भारत सरकार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च, कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने अनुक्रमे ३५ आणि ०२ प्रशिक्षण कार्यक्रम, आयआयआयटी बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने 09 फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम, 09 आंतरराष्ट्रीय परिषद आणि 09 राष्ट्रीय, ०१ राज्यस्तरीय परिषद, ४५ फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथे परीक्षक म्हणून काम केले. ३८ परिषदांसाठी सत्र अध्यक्ष, परीक्षक, तज्ञ, नॅक मार्गदर्शन, एलआयसी समितीचे सदस्य, विद्यापीठ कर्मचारी निवड तज्ञ, शैक्षणिक संशोधन अंतर्गत आणि बाह्य वरिष्ठ पर्यवेक्षक, विषयांचे अध्यक्ष, पेपर सेटर आणि परीक्षक, अभ्यासक्रमाच्या विकासाचे सदस्य विभाग प्रमुख डिपार्टमेंट ऑफ स्पेस, भारत सरकार, नोडल सेंटर समन्वयक, नॅक समन्वयक, नोडल अधिकारी अशा अनेक उल्लेखनिय कार्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
3) सामाजिक संस्था पूरस्कार – वृक्ष संवर्धन समिती – वृक्ष संवर्धन, बार्शी – आपण वृक्ष संवर्धन समिती ही एक संस्था नसून झाडे लावने व ती संवर्धीत करणे तसेच याची लोकचळवळ बनविणे या ध्येयाने प्रेरीत झालेल्या व पर्यावरणाचा समतोल राखण्याचे ध्येय वेड घेतलेल्या तरुणांचा विधायक विचार आहे. २०१९ पासून १५००० वृक्ष लागवड व दररोज श्रमदानातुन ते वृक्ष संवर्धन, स्वच्छ बार्शी सुंदर बार्शी हरित बार्शी या विचारावर कार्य गेली ३ वर्षे समिती सदस्य दररोज सकाळी ६.३० ते ८ या वेळेत वृक्ष संवर्धन व स्वच्छता या साठी अविरत तनमन धनाने कार्य करतात. पत्रलेखन, दिनदर्शिका, मंदिर व परिसर सुशोभिकरण व अनेक पर्यावरण पुरक उपक्रम आणि या उपक्रमांची नोंद ओ. एम. जी. बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. तसेच आत्तापर्यंत वसुंधरा प्रतिष्ठान लातुर, सकल मराठा समाज बार्शी, छावा प्रतिष्ठान बार्शी, युगदर्शक आयकॉन, लायन्स क्लब, नगरपालिका, दलित महासंघ यांचे पुरस्कार या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
4) साहित्य पूरस्कार – मा. श्री. मारुती सिद्राम कटकधोंड – सोलापूर – आपण आपले कुंपन वेदनांचे, उन्हे परतून गेल्यावर, डोहतळ काव्यसंग्रह व मानतल काही या क्षणिकेच्या लेखन माध्यमातून साहित्य क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य तसेच या उत्कृष्ट लेखनामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गदिमा साहित्य पुरस्कार, कवी शाहीर आनंद फंदी काव्य पुरस्कार, कवी कालिदास साहित्य मंडळ बार्शी, मेघदुत पुरस्कार, उच्च व तंत्र शिक्षण मुंबई, रंगनाथन साहित्य पुरस्कार, मनोरमा साहित्य पुरस्कार, आमदार बबनदादा शिंदे साहित्य पुरस्कार, हे वैयक्तिक तर डोहतळ काव्य संग्रहास १४ पुरस्कार, २० ठिकाणी विशेष सन्मान, यामाध्यमातून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
5) क्रीडा पुरस्कार – मा. श्री.प्राचार्य हरिदास महादेव रणदिवे – आपणा प्रती हे गौरव पत्र अर्पण करीत असताना आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत आहे. आपण संत सावता माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अरण, ता. माढा, जि. सोलापूर २००३ मध्ये अमरावतीमधून धनुर्विद्या प्रशिक्षण घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रथमच धनुर्विद्या मार्गदर्शन सुरु करुन धनुर्विद्या संघटनेची स्थापना, २० वर्षात ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर धुनर्विद्येत सहभाग नोंदवून भारत देशात धनुर्विद्येत दिली जाणारी सुवर्ण ढाल तीन वेळा विद्यालयाने जिंकली, महाराष्ट्र शासनाचे गुवणंत खेळाडु, मार्गदर्शक, संघटक असे ९ प्रकारचे पुरस्कार दिले, विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवून प्रशासकीय सेवेत कार्यरत, तसेच कुस्तीपटु काजल जाधव राष्ट्रीय पातळीवर दिल्लीत सहभाग, अनेक क्रिडा प्रकारात मार्गदर्शनामुळे अनेक सांघीक, वैयक्तिक, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
6) कला पूरस्कार – मा. श्री. गजेंद्र निकम (शिल्पकार), बार्शी. – आपण जी. डी. आर्ट शिल्पकला व प्रतिमा नबंध प्रथम श्रेणी बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई, ४९ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, कोल्हापूर, वार्षिक कलाप्रदर्शन, दसरा महोत्सव, आकार कलाप्रदर्शन, दै. सकाळ, लोकमत कला प्रदर्शनात उत्कृष्ठ कलाकृती सादरिकरण मागील १७ वर्षापासून बार्शी, पुणे, उस्मानाबाद, अमरावती, कोल्हापूर या ठिकाणी शिल्प प्रतिष्ठापणा, अमेरीकन कंपनीद्वारे सिने आर्टिस्ट म्हणून कार्य, विविध शाळांत शिल्प प्रात्याक्षिकाचे मोफत मार्गदर्शन, परिक्षण व लहान मोठे २०० हुन अधिक शिल्प निर्मिती या माध्यमातून कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
7) सांस्कृतिक पूरस्कार – मा. श्री. चंद्रकांत कुंभारे, बार्शी. – आपण क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यात प्रथम व उत्कृष्ठ कलाकार पुरस्कार, राज्यस्तरीय १०० विविध स्पर्धामध्ये नृत्य परिक्षक, लावणी महोत्सवात परिक्षक, चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाचे काम, अनेक राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग, साक्षरता अभियान, नाट्य, नृत्य, व गायनाच्या माध्यमातून सादरीकरण, उत्कृष्ठ नृत्य मार्गदर्शक, शिक्षक म्हणून उत्कृष्ठ कार्य, जणगणना उत्कृष्ठ कार्यबद्दल पारितोषिक, कोवीड योद्धा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपन या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
8) पत्रकारिता पूरस्कार – मा. श्री. आनंदकुमार उत्तमराव डुरे (पत्रकार दै. लोकमत ) – आपण एम.ए.बी.पी.एड. प्रथम श्रेणी करुन गेली २३ वर्षे उत्कृष्ठ क्रीडा शिक्षक म्हणून कार्य, खोखो, कब्बड्डी, कुस्ती या खेळात तालुका जिल्हा व विभागस्तरापर्यंत संघ, पत्रकार म्हणून दै. संघर्ष १ वर्ष, दै. संचार ६ वर्षे व दै. पुढारी सलग १८ वर्षे व सध्या दै लोकमतसाठी विभागासाठी उत्कृष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत, ४८ वेळा रक्तदान, कोल्हापूर पुरग्रस्तांना प्रत्यक्ष जावून १४ लाखांच्या औषधांचा पुरवठा, कोरोना काळात निराधारांना, कार्यरत कर्मचारी व पोलिसांना सहाय्य, वैराग कोशेंटाईन सेंटरचा पाठपुरावा अनेक रुग्णांना बेड उपलब्धता, संभाजी ब्रिगेड, शिवस्पर्श प्रतिष्ठान, दलित मित्र मंडळ, यांचे पत्रकारीता व सामाजिक कार्यासाठी पुरस्कार या माध्यमातून पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
9) अध्यात्मिक पूरस्कार – मा. ह. भ. प. श्री. रंगनाथ महाराज काकडे ढोराळेकर – आपण प्राथमिक शिक्षक, मुख्यसचिव- अखिल भारतीय वारकरी मंडळ, कार्याध्यक्ष-जगद्गुरु संत साहित्य परिषद, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, १९९७ पासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रवचन, व्याख्याने, २०१७ पासून हरिकिर्तन सेवा, वर्तमान पत्रात अनेक प्रासंगिक लेख, रंग कविता संग्रह, थोरांची ओळख पुस्तक, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीरे, कोवीडमध्ये जनजागरण, निवडणुका, जनगणना, उत्कृष्ट अध्यापन कार्य, तज्ञ मार्गदर्शक, शाळेसाठी तन मन धनाने कार्य, स्वखर्चाने प्रवचनमाला, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन व संयोजन, या सामाजिक प्रबोधन कार्यामुळे एकलव्य पुरस्कार, परिवतर्न पुरस्कार, नेहरु युवा पुरस्कार, सत्यगुरु पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र गुणीजनरत्न पुरस्कार, क्रांतीसुर्य महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार, कर्नाटक राज्यातील इंडियन एप्लायर युनिव्हर्सिटी कडुन सामाजिक सेवेसाठी मानद डॉक्टरेट पदवी बंगलोर येथे प्रदान यामाध्यमातून अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
10) कर्मचारी भुषण पुरस्कार – मा. श्री. माधव धर्मराज धेंडे – साकत पिंपरी – आपण तलाठी व अव्वल कारकुन म्हणून गेली २४ वर्ष सेवा, कार्यतत्पर कर्मचारी असल्याने एका वेळी १0-१0 गावांचा जादा कार्यभार तरीही गरजु शेतकऱ्यांसाठी तत्पर सेवा, पुर्वी सातबारा लिखीत स्वरुपात असतानाही सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या साताबारा नोंदी व इतर सेवा विनाविलंब, शेतकऱ्याचे घरे जळुन संसार उघड्यावर आलेला असताना तत्पर सेवा देवून शासनाची सर्व मदत तात्काळ मिळवून दिली, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे वेळोवेळी तात्काळ करून मदत या बरोबर जळवा या काव्यसंग्रहातुन शेतकऱ्याच्या मनातील जखमी वेदना मांडल्या तसेच कूस या काव्यसंग्रहातुन समाज वेदना मांडून उत्कृष्ठ कार्य करुन कर्मचारी म्हणून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
11) युवा उद्योजक पूरस्कार – मा. श्री. अनिकेत गजानन कलशेट्टी सोलापूर – आपण संचालक, सन्मित्र डेव्हलपर्स सोलापूर, सन्मित्र डेव्हलपर्स कडून आजवर देण्यात आलेल्या उत्कृष्ट सेवेमुळे आणि विश्वासू कार्यपद्धतीमुळे सोलापूरकर प्लॉट घेण्यासाठी सन्मित्र डेव्हलपर्सची निवड करतात, सन्मित्र डेव्हलपर्स गुंतवणूकराचा खरा मित्र हे ब्रिद घेऊन विश्वासू सेवे बरोबर, दयाल विहार अल्प उत्पन्न धारकांसाठी हप्त्याने प्लॉट, दयाल पार्क- शिक्षकांना एकत्र राहता यावे यासाठी माफक दरात प्लॉट, दयाल सिटी पोलिस बांधवांसाठी पोलिस वसाहत उभारणी, गेन सिद्ध सरोवर सुंदर प्रकल्प सर्व सोयीयुक्त हायवे टच सर्व स्तरातील नोकरदार व उद्योजकांसाठी प्रकल्प, शिवसुर्या पार्क विजापूर रस्त्यावर सर्व सोयींनी युक्त समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींसाठी विश्वासू व विनम्र व माफक दरात सेवा देऊन कमी वयात उद्योग क्षेत्रात विनम्र व विश्वासू वृत्तीने उतुंग भरारी घेऊन उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य.
तसेच संस्थेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक उपक्रमासोबत कला निगडित उपक्रम देखील आयोजित केले जातात याचाच एक भाग म्हणून संस्थेने भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे
More Stories
लोकसेवा विद्यालयाच्या आदर्श कोल्हे याची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
एसटीच्या नव्या लालपरीचा लूक अखेर आला समोर
शनिवारी १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंड्यात