कार्यक्रमासाठी सोजर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती प्रतिभा हावळे-मॅडम व सहसमन्वयक माननीय श्री.मोहन लोहार-सर हे प्रमुख पाहुणे होते.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्याबाबत सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी महाविद्यालयामध्ये “पोस्टर मेकिंग” व “रांगोळी स्पर्धांचे” सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यासाठी श्रीमती लवटे मॅडम, कसबे मॅडम आणि पाटील मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
श्रीमती प्रतिभा हावळे-मॅडम व श्री.मोहन लोहार-सर यांच्या हस्ते रांगोळी व पोस्टर स्पर्धांचे मूल्यांकन करण्यात आले. गुंड शुभम व आनंद भागवत यांनी “रांगोळी स्पर्धा” तर ज्योती कदम या विद्यार्थिनीने “पोस्टर मेकिंग स्पर्धेत” विजेतेपद पटकावले. यानंतर सानिका सुरवसे व स्वप्नाली झालटे या विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिन व आजची महिला यावर प्रकाशझोत टाकणारी मनोगते व्यक्त केली.
सन्माननीय श्रीमती प्रतिभा हावळे-मॅडम या आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाल्या, “जागतिक महिला दिन” हा साजरा करण्याचे कारण म्हणजे, *आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये भारतीय स्त्री ही पूर्वापार काळापासून संघर्षच करत आली आहे. त्यामुळे स्त्रियांना पाठिंबा देण्याच्या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या मर्यादित न राहता प्रत्येकाच्या कृतीत उतरायला हव्यात; म्हणजे या बाबीच आजच्या स्त्रीयांसाठी खूप मोठ्या पर्वणीच्या ठरतील यात शंका नाही. अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर माननीय श्री.मोहन लोहार-सर यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे स्त्रीच असते हे अनेक ऐतिहासिक उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
अधिव्याख्याते शुभम मगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच ग्रंथपाल अतार-सर यांनी कार्यक्रमासाठी ध्वनी संचालन व चित्र संचालन आणि मोकाशे सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीरित्या होणेबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सुजित करपे-सर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष आदरणीय श्री.अरुण(दादा) बारबोले यांनी या निमित्त व स्तुत्य उपक्रमाबाबत सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन