केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा )अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे विविध उपक्रम राबवून आघाडी घेतली.
यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा चित्रकला स्पर्धा, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांची तयारीची माहितीही मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे मॅडम यांनी दिली.
राज्यभरात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
आज दिनांक १४/८/२०२४ रोजी या उपक्रमाचा दुसरा दिवस साजरा करण्यात आला यामध्ये प्राथम सर्व शूर वीरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती के. डी धावणे मॅडम यांनी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
▪︎ शशिकांत शिंदे, ( शिंदे अग्रो सर्विसेस) चिंचोली यांनी २१ वर्षे बजावली असून केंद्रीय राखीव दल इन्स्ट्रक्टर H/C/G/D, ऑल इंडिया जम्मू काश्मीर रॅपिड ॲक्शन फोर्स, सेंट्रल ट्रेनिंग कॉलेज नांदेड, जम्मू काश्मीर मध्ये उग्रवादी ऑपरेशन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
▪︎ सदाशिव भानुदास गोंदील, बार्शी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदाशिव गोंदील हे १८ वर्षे भारतीय सेनेत नाईक पदावर कार्यरत होते. तसेच सलग ७ वर्षे झाशी, हैद्राबाद, नाशिक तोफखाना ( Ammunition Factory) येथे उत्कृष्ट सेवा Good Services Medal प्राप्त झाले आहे.
▪︎ शालिवाहन श्रीधर पवार, पानगाव यांनी भारतीय सैन्यात सतत २० व वर्षे सेवा बजावली आहे. ऑपरेशन ब्लास्टर या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मराठा रेजिमेंट मध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. लेह लढाक, पंजाब, मिझोरम, उत्तर प्रदेश, नागालॅंड, येथे कार्यरत होते.
▪︎ रमेश कदम, वालवड ( बार्शी ) भारतीय सेनेत हवालदार पदावर २५ वर्षे सेवा बजावली. अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गोवा, सिक्कीम, याठिकाणी ते कार्यरत होते.
▪︎ यशवंत दिगंबर जाधव, बार्शी यांनी भारतीय सेनेत २५ हवालदार पदावर सेवा बजावली. लडाख, भारत पाकिस्तान बॉर्डर, भारत बांगलादेश बॉर्डर, नक्षलवादी एरियात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
यावेळी मेजर शशिकांत शिंदे विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर रहाण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कसबे सर यांनी केले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न