सोलापूर: राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजने अंतर्गत राज्यातील वय १८ ते ३० वर्षामधील, अनुसूचित जाती / जमाती, दारिद्र्य रेषे खालील, अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यंत भूधारक) लाभार्थींकडून दि. ३१ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

तरी इच्छुक अर्जदारांनी योजनेचे विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भास्कर परांडे यांनी केले आहे.
राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येत असून, महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. योजनेची पूर्ण माहिती / अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या www.mahamesh.in या संकेतस्थळावर तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Ahilya Yojana App द्वारे वरील दिलेल्या तारखांमध्येच करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी.
More Stories
रत्न आभूषण उद्योगात महिला उद्योजकांना येण्यास प्रोत्साहन द्यावे : राज्यपाल रमेश बैस
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जुलूस
अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी