Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > चार लाख कोटींच्यावर डिजिटल देवाण घेवाण सन २०-२१ मध्ये ८८ टक्क्यांनी वाढला इ पेमेंटचा वापर

चार लाख कोटींच्यावर डिजिटल देवाण घेवाण सन २०-२१ मध्ये ८८ टक्क्यांनी वाढला इ पेमेंटचा वापर

मित्राला शेअर करा

अलिकडे आपण पाहत आहोत की छोट्या चहाच्या टपरीवर सुद्धा डिजिटल पेमेंटचा वापर केला जात आहे तसेच ग्रामीण भागात सुद्धा ऑनलाईन पेमेंट चा वापर मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

देशात गेल्या तीन वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये ८८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना दिली.

२०१८-१९ या आर्थिक वर्षात २ लाख ३२ हजार ६०२ कोटींचे डिजिटल व्यवहार झाले २०१ ९ – २० मध्ये हे प्रमाण ३ लाख ४० हजार २५ कोटींपर्यंत पोहोचले, तर ४ लाख ३७ हजार ४४५ कोटींचे डिजिटल व्यवहार २०२०-२१ मध्ये झाल्याचे डॉ. कराड म्हणाले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पैसे देण्यासाठीचा भारताचा स्वतःचा मंच यूपीआयला डिजिटल पेमेंटसाठी आवडता मंच म्हणून देशाने पसंती दिली.

वित्तीय वर्ष २०२० २१ मध्ये २२ अब्जांपेक्षा अधिक व्यवहार या मंचावर नोंदविला गेला. गेल्या तीन वर्षांमध्ये यूपीआयमध्ये चौपट वाढ दिसून आली आहे. शिवाय, वित्तीय वर्ष २०२० २१ मध्ये आधार ‘ आधारित अवलंबित पेमेंट प्रणालीने आंतर बँक व्यवहारांमध्ये गेल्या चार वर्षांच्या तुलनेत नऊपटींनी वाढ झाल्याचे डॉ. कराड म्हणाले